मनोज भगत
ग्रामीण प्रतिनीधी तेल्हारा
तेल्हारा : श्री डॉ मुरली इंगळे साहेब प्रकल्प संचालक आत्मा अकोला यांचे मार्गदर्शना खालील तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समिती सभा दुपारी 1.00 वाजता श्रीकृष्ण मंदिर तेल्हारा येथे आयोजित करण्यात आली सभेला गौरव राऊत तालुका कृषी अधिकारी तेल्हारा यांनी सर्व आत्मा समीतीत नियूक्त सर्व सदस्य चे पुष्पगुच्छे देउन स्वागत केले. तर तेल्हारा तालुका प्रथम अध्यक्ष म्हणून श्री श्रीकृष्ण ज्ञानदेव मानकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दिपक मोगरे बीटीएम यांनी आत्मा योजना अंतर्गत समितीचे कार्य सदस्य च्या कर्तव्य जबाबदारी तसेच सन 2023-24अंतर्गत मंजूर कृती आराखडा व कृषी विभागाकडील महत्वपूर्ण योजना विषयी माहिती अवगत केली.सभेला सर्व नियुक्त सदस्य मंडळ कृषी अधिकारी श्री माळी साहेब, कृषी पर्यवेक्षक श्री खंडागळे साहेब कोरडे मॅडम श्री सारभुकन साहेब मंगेश आर्य उपस्थित होते.


