मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : स्थानिक हिवरखेड येथील शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या सेंट पॉल अकॅडमी मध्ये आपल्या सांस्कृतिक ठेवा ही जपण्याचे काम करत असल्याच पाहायला मिळाले आहे.या अशी सुद्धा संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेल होत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य शारदा लखोटीया, रेखा चांडक, सुधा डागा सीमा तिवारी उपमुख्याध्यापिका निमिता गांधी यांची उपस्थिती होती. दीपप्रज्वलनाने या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आजच्या कार्यक्रमांचे प्रास्ताविक शाळेच्या उपमुख्याध्यापक निमिता गांधी मॅडम यांनी करून कार्यक्रमाची संकल्पना याबद्दल उपस्थित महिला पालकांना माहिती दिली त्यानंतर उपस्थित महिला पालकांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होतो शाळेतील महिला शिक्षकांनी आलेल्या सर्व महिला पालकांचे कुमकुम तिलक लावून स्वागत केले विजयी होणाऱ्या पालकांसाठी विशेष अशा बक्षिसांची व्यवस्था ही करण्यात आलेली होती.कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता विमल येऊल सुलभा येलुकार पूजा बाजारे ढोले मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.











