रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
स्थानिक हिवरखेड येथील शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या सेंट पॉल अकॅडमी मध्ये आपल्या सांस्कृतिक ठेवा ही जपण्याचे काम करत असल्याच पाहायला मिळाले आहे. आज 22 डिसेंबर म्हणजेच गीता जयंती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटीया, प्रमोद चांडक, लुनकरण डागा, दीपम लखोटिया, शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी, उप मुख्याध्यापिका निमित्त गांधी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी किशोर जवंजाळ सर उपस्थित होते. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गीतेतील वेगवेगळे श्लोक म्हणून त्यांचा अर्थ आपल्या जीवनाशी कशा प्रकारे समरूप आहे हे सादर केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी गीतेतील प्रसंग नृत्याद्वारे व नाटकाद्वारे सादर केले. त्यानंतर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये गितेचे किती महत्त्व आहे यावर आपले विचार व्यक्त केले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री जवंजाळ सर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की शाळेमध्ये अध्ययन अध्यापना बरोबरच आध्यात्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी कशी निर्माण करता येईल, विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्श कसे निवडावे यावर त्यांनी प्रकाश टाकला सर्वात शेवटी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी श्रेया पोके हिने केले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता स्वप्निल कातव सर, सुलभा येलुकार मॅडम,पूजा बाजारे मॅडम,ढोले मॅडम, खारोडे सर,अनिल सर,अमित सर, अतिक सर,सचिन सर,रविंद्र सर,दिगंबर सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आता परिश्रम घेतले.