दिनेश आंबेकर
तालुका प्रतिनिधी जव्हार
जव्हार – मोखाडा तालुक्यातील भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पुढाकाराने शेतकऱ्यांचा दि – २२ डिसेंबर २०२३ ला विविध मागण्यांसाठी जव्हार प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आले.सत्ताधारी पक्षांच्या विरोधात कम्युनिस्ट पक्ष च्या पुढाकाराने शेतकरी रस्त्यावर उतरून मोर्चाच्या माध्यमातून जव्हार प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार होते परंतु येथील प्रांत अधिकारी नेहा भोसले हे आज कार्यालयला गैरहजर असल्याकारणाने शेतकरी आणि प्रांत अधिकारी यांच्याशी काही संवाद करू शकले नाही आणि जव्हार मोखाडा तालुक्यातून हजारो शेतकरी नाराज होवून घरी परतला आणि पुढील बैठक ही २ जानेवारी २०२४ ला होणार आहे.या मध्ये शेतकरी यांच्या प्रमुख मागण्या वनधिकार कायद्याची अंमलबजावणी करून नवरा बायकोच्या नवे सात बारा मिळाला पाहिजे,वाढलेली महागाई,रोजगार हमी योजना,जिल्ह्यातील रखडलेली पेसा भरती,जनजीवन मिशन ची ताबडतोब पूर्ण करा,घरकुल आवास योजना लक्षांक वाढवावा पी.डब्लू.डी. ची जिल्हा परिषद रस्त्यांची कामे पूर्ण झाली पाहिजे सुशिक्षित तरुणांना बेरोजगार भत्ता मिळावा अश्या विविध १५ मागण्यासहित मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील बस्थानकापासून रॅली काढून त्यामध्ये विविध माध्यमामधून घोषणा देत या मोर्चाची सुरवात करून तालुका प्रांत कार्यालय येथे पर्यंत आपल्या मागण्या शासन दरबारी पोहचविण्याचे प्रयत्न या पक्षाकडून करण्यात आले.
या प्रसंगी ठाणे पालघर जिल्हा सेक्रेटरी कॉ किरण गहला,राज्य कौसिल कमिटी सदस्य अ.भा.की.सभा कॉ यशवंत बुधर,जव्हार तालुका अध्यक्ष कॉ लक्ष्मण जाधव,जिल्हा परिषद सदस्य कॉ मनिषा बुधर , पंचायत समिती सदस्य कॉ ज्योती बुधर,सरपंच,विनोद बुधर,विजय शिंदे,सुरेश लाखन,शिवराम बुधर,यशवंत घाटाळ, शांतीबाई कुरकुटे व इतर नागरिक व मान्यवर उपस्थित होते.


