विनोद शर्मा
तालुका प्रतिनिधि चिमूर
चिमूर:-शेगांव (वरोरा)येथून सारंगगड येथे मयतीच्या कार्यक्रमाकरीता जात असतांना वाटेत चिमूर नेरी मार्गावर पोर्ल्टीफार्म जवळ चारचाकी फोरव्हिलर गाडी क्रमांक
एम.एच.२६ एल.१६६७ वाहन पलटी झाली टाटा सुमोचा राड तुटल्याने अपघात झाला.
प्राप्त माहिती नुसार एक वयोवृद्ध व एक व्यक्ती गंभीर जखमी झाले असून यात पाच महिला जखमी असल्याची माहिती मिळाली. चिमूर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.


