रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा =दि-19- डिसेंबर 2023 येथील इसाफ (ESAF) बँकेच्या अकोट शाखेतर्फे स्थानिक श्री शिवाजी हायस्कुल अकोट येथे आज दि-19- डिसेंबर 2023 रोजी बालज्योती थीम अंतर्गत आर्थीक साक्षरता उपक्रम राबविण्यात आला. तसेच भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा 175 व्या जन्मदिनानिमित्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. या उपक्रमा अंतर्गत विधार्थ्यांना बँकींग व्यवहार, आर्थीक फसवणूकी, सुरक्षीत आर्थीक व्यवहार आदी विषयी माहीती देवून मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.संजय वॉलशिंगे सर हे होते , प्रमुख पाहुणे म्हणून उप मुख्याध्यापक श्री नितीन कडू सर तसेच पर्याव्यक्षिका अंजली सपकाळ तसेच माजी शिक्षक विजय जितकर सर व यशवंतराव चौहान स्कूलचे मुख्याध्यापिका सौं शिला ताई वॉलशिंगे उपस्तिथ होत्या .इसाफ बँकेच्या माध्यमा तुन आर्थीक साक्षरता तसेच सायबर सेक्युरीटी विषयी उत्कृष्ट उपक्रम राबविण्यात येत आहेत, आज अत्याधुनीक तंत्रज्ञानाच्या जगात आर्थीक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. फसवणुक करणारे लोक विविध माध्यमातून ‘आमीष दाखवून ग्राहकांची फसवणुक करीत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहार करतांना आपली फसवणूक होऊ नये यासाठी बँक ग्राहकांनी जागृकपणे आर्थीक व्यवहार करावे, कोणत्याही आमीषाला बळी पडू नये. तसेच विद्यार्थ्यांनी आपले उज्वल भविष्य घडविण्या साठी प्रयत्नरत असाव, कार्यक्रमा चे संचालन इसाफ बैंक चे अधिकारी श्री. सागर हिरोळे यांनी केले. नंतर कार्यक्रमाचे संपूर्ण मार्गदर्शन श्री.अमर सर लाखे यांनी केले तसेच कार्यक्रमाला बँक कर्मचारी अक्षय टेकाडे, प्रकाश झंवर, प्रशांत बिजवे, हे उपस्थीत होते.


