सुदर्शन मंडले
ग्रामीण प्रतिनिधी आळेफाटा
आळेफाटा(प्रतिनिधी):घेतलेले पैसे परत देत नसल्याच्या कारणास्तव एका बावीस वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा प्रकार आज(शुक्रवारी)दुपारी आळे संतवाडी गावच्या शिवारातील जंगलात उघडकीस आला.
गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव किरण मोतीराम राठोड असे नाव असून त्याच्या पॅन्ट च्या खिश्यात पोलिसांना आढळलेल्या चिठ्ठीत सहा जणांची नावे आढळून आली आहेत.
किरण राठोड या तरूणाला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्या सहा जणांविरुद्ध आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिस उपनिरीक्षक रागिणी कराळे यांनी सांगितले.
मयत तरुणाचे वडील मोतीराम रेकु राठोड यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,संतवाडी गावचे हद्दित हाँटेल फाऊंटनचे पाठीमागे जंगलात त्यांचा मुलगा किरण याच्या पॅन्टच्या खिषात मिळालेले चिठ्ठीमध्ये नावे असलेले सहा इसमानी त्याचेकडुन उसने पैसे घेवुन ते त्यास परत दिले नाही,त्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करून, त्यास गळफास घेवुन आत्महत्या करणेस प्रवृत्त केले म्हणुन फिर्यादी यांची वरील इसमांचे विरूद्ध तक्रार दिली आहे.
याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर करीत आहेत.