रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
नुकत्याच अमरावती येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत हिवरखेड येथील श्री समर्थ अकॅडमीला उत्कृष्ट पुरस्कार मिळाला असून या पुरस्काराने त्या अमरावती येथे गौरविण्यात आले आहे.हिवरखेड येथील श्री ,समर्थ अकॅडमी हे दरवर्षी आपले विद्यार्थी स्पर्धेत उतरवीत असते या वर्षी सुद्धा अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून राज्यस्तरावर आपले नाव चमकवले आहे. समर्थ अकॅडमी मधून ३४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते यामधून १५ विध्याथ्यांनी वेगवेगळ्या स्तरावर यश संपादन केले तर १९ मुलांनी सुवर्णपदक पटकाविले आहे . तर १२ विध्याथ्यांची कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे.श्री समर्थ अकॅडमीच्या संचालिका प्रियंका सिसोदिया व यशस्वी विध्याथ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.