संतोष भरणे
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
कळस – रुई तालुका इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालय या ठिकाणी काल बारामती पोलीस स्टेशन आणि जंक्शन पोलीस स्टेशन अंतर्गत विद्यालयात निर्भयपथकाची स्थापना करण्यात आली.सध्या तरुण पिढी मोबाईल मुळे वाईट मार्गाकडे चालली आहे,मुले आणि मुली इंस्टाग्राम फेसबुकद्वारे मित्र बनवतात आणि यातून वेगवेगळ्या वाईट घटना घडतात अशा वेळी मुलींनी विशेष करून यापासून दूर राहिले पाहिजे प्रत्येक वेळी मुलेच दोषी असतात असे नाही मुलींकडून ही काही चुका घडतात त्यामुळे काही अनुचित प्रकार घडतात.म्हणून कुठल्याही मुलींनी चुकीची माहिती देऊ नये.मुलींनी चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श काय आहे हे आपल्या आईशी शेअर करावे,ग्रामीण भागातील मुलींना रस्त्याने जाताना येताना काही टवाळखोर मुलांचाही त्रास या मुलींना होत असतो अशावेळी निर्भया पथकाच्या टोल फ्री क्रमांकाशी संपर्क साधावा किंवा विद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही निर्भय पथकाच्या रोहिणी ढमे मॅडम यांनी व्यक्त केले.यावेळी त्यांच्या समवेत ज्योती जाधव मॅडम तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील,पर्यवेक्षक तानाजी मराडे,विद्यालयाच्या शिक्षिका मीरादेवी पाटील,प्रतीक्षा पाटील उपस्थित होत्या,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनाजी गावडे यांनी केले सौ मीरादेवी पाटील यांनी आभार मानले. यावेळी विद्यालयाचे वतीने रोहिणी ढमे मॅडम व ज्योती जाधव मॅडम यांचा घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पाचवी ते दहावीच्या सर्व मुली व शिक्षक-शिक्षिकाआणि कर्मचारी उपस्थित होते अशी माहिती.विद्यालयाचे कलाशिक्षक अमीन मुल्ला यांनी दिली.


