मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला भारतीय संविधान दिले या संविधान दिनानिमित्त व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र चैत्यभूमीचे शिल्पकार यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त भारतीय बौद्ध महासभा तालुका चांदुर रेल्वे व नवजीवन मागासवर्गीय समाज विकास केंद्र चांदुर रेल्वे यांचे तर्फे धम्मज्ञान स्पर्धा व तालुक्यातील वर्षावास कालावधीमध्ये बुद्ध आणि त्या धम्म ग्रंथ वाचन करणाऱ्या बौद्ध उपासक व उपासिका यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 ला अशोक महाविद्यालय चांदुर रेल्वे येथे आयोजित केला असता या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान सुनील भाऊ वानखेडे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हे होते कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नवजीवन मागासवर्गीय समाज विकास केंद्राचे अध्यक्ष तथा जिल्हा संघटक विलास भाऊ आठवले भारतीय बौद्ध महासभा अमरावती पूर्व हे होते.या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून बोधिसत्व ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष मांडवधरे साहेब फुफगाव तालुका नांदगाव खंडेश्वर तसेच बोधिसत्व ग्रुपचे सदस्य सिद्धार्थ भाऊ कांबळे राजुरा आणि भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सहसचिव प्रेमचंद अंबादे होते.तसेच केंद्रीय शिक्षिका आयुनी मीनाताई आठवले.व भारतीय बौद्ध महासभा तालुका चांदुर रेल्वे संघटक संस्कार आयूनी शारदाबाई वानखेडे उपस्थीत होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समयुक्ता आठवले यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे स्वागत, स्वागत गीताने तसेच आभार प्रदर्शन अभय रामटेके तालुका संघटक यांनी केले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास आठवले यांनी केले असून मनोगत प्रेमचंद अंबादे.सिद्धार्थ भाऊ कांबळे सुधाकरराव मांडवधरे भाऊ यांनी केले. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा तालुका चांदुर रेल्वे च्या वतीने चांदुर रेल्वे येथील सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक तसेच जिल्हाध्यक्ष धम्म प्रशिक्षण केंद्र अमरावती जिल्हा, बंडूभाऊ आठवले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या मातृसंस्थेचे म्हणजेच भारतीय बौद्ध महासभेचे आजीवन सदस्य स्वीकारल्याबद्दल त्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील बोद्ध विहारामध्ये ग्रंथांचे वाचन करणाऱ्या बौद्ध उपासक आणि उपासिका यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यामध्ये मांजरखेड कसबा येथील सौ ललिता राजेंद्र वानखडे मैत्रीय या बुद्ध विहार. कळमगाव येथील संजय ज्ञानेश्वर बोरकर समता बुद्ध विहार खरबी मांडवगड येथील शारदा योगेश बागडे. रमाई महिला बुद्ध विहार कळमगाव. येथील सुप्रिया अनामत राऊत लुंबिनी बुद्ध विहार टेंभुर्णी येथील आम्रपाली बाळाभाऊ हरणे.रमाबाई आंबेडकर विहार विर्शी ता.भातकुली येथील विशाखा प्रवीण चतुर समता बुद्ध विहार. सावंगी मगरापूर येथील रोहित मारुती मेश्राम विश्वशांती बुद्ध विहार कवठा कडू .येथील प्रतीक्षा शुद्धधन गेडाम प्रजापती गौतमी बुद्ध विहार. सुनील ढोकणे कीरजवळा विशाखा महिला बुद्ध विहार.रेश्मा सोमेश्वर रामटेके सावंगा विठोबा नागार्जुन बौद्ध विहार. नलिनी वासनिक व इतर धम्म उपासिका मूलगंधकुटी विहार चांदुर रेल्वे आणि या प्रसंगी धम्मज्ञान स्पर्धेकरिता एकूण 30 विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी झाल्याबद्दल बोधिसत्व ग्रुप तर्फे बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ भेट देण्यात आला तसेच कार्यक्रमाला उपस्थित सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका यांनासुद्धा बुद्धाने त्या धम्मा ग्रंथाचा पुस्तक भेट देण्यात आले . या कार्यक्रमाला मोठया प्रमाणात बौद्ध उपासक आणि उपसिका उपस्थित होत्या.