माबुद खान
तालुका प्रतिनिधी जिंतूर
जिंतूर शहरातील नवयुवकांचा मा.आ.विजय भांबळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंपर्क कार्यलय, येलदरी रोड जिंतूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला. त्यात शहरातील झाकीर शेख, असेफ पठाण, एस.के. मौजुद, अब्दुल रझाक, मोसिन खान, शोएब शेख, सय्यद साजिद, सय्यद परवेज, महेफुज देशमुख, आयान शेख, मुखिद पठाण, नविद शेख,शेख नदीम ई. नी भाजपची ध्येय धोरणे व जिंतूर येथील अकार्यक्षम नेतृत्व यांना कंटाळून मा.आ.विजयराव भांबळे साहेबयांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी मा.आ.विजयराव भांबळे साहेब यांनी सर्वांचे हार व पक्षाचा रुमाल घालून पक्षात स्वागत केले व पुढील निवडणुकीसाठी सर्व ताकतीने कामास लागून मा.ना.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार व विकास तळागळापर्यंत पोहचवण्याचा सल्ला दिला. यावेळी गणेशराव ईलग, शरदराव अंभुरे, रा. कॉ. तालुकाध्यक्ष मनोज थिटे पाटील, शाहेद सिद्दीकी ई. सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.