निशांत मनवर
शहर प्रतिनिधी, उमरखेड
उमरखेड (दि.२१ डिसेंबर) महागाव तालुक्यातील मौजे काळी (टेंभी) येथे फुलसावंगी मंडळातील पथकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करुन कठोर कार्यवाही करावी. दिनांक २०/ १२/२०२३ रोजी मौजा काळी (टेंभी) येथे रात्री अं. १० वाजता दरम्यान काळी (टेंभी) येथे ट्रॅक्टरची तपासणी फुलसावंगी मंडळात करीत असतांना पथकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.या हल्ल्यामध्ये फुलसावंगी मंडळातील मंडळ अधिकारी संजय नरवाडे यांना खुप मारहान केली.तसेच फुलसावंगी तलाठी गणेश सदाशिव मोळके व वाहन चालक महादेव हुसेन आडे यांच्यावर काळी (टेंभी) येथील अं. १५ ते २० हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला व त्यामध्ये तलाठी गणेश सदाशिव मोळके यांना डोक्याला व पायाला रॉडने मारहान करुन रक्तबंबाळ करण्यात आले.त्यामुळे त्यांना रात्री ग्रामिण रुग्णालय सवना येथे उपचाराकरीता नेण्यात आले.परंतु तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तलाठी यांची तब्बेत गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालय यवतमाळ येथे पाठविण्यात आले.
सदर घटनेचा विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग उमरखेड तिव्र निषेध नोंदवला आहे.
चौकट:- (सदर घटनेतील हल्लेखोरांना तात्काळ अटक करुन कायदेशिर कार्यवाही करावी. अन्यथा विदर्भ पटवारी संघटना नागपूर उपविभाग उमरखेड पुढील आंदोलनाची रुपरेषा ठरवतील.)
तसेच सदर गौणखनिज पथकामध्ये नायब तहसिलदार दर्जाचे अधिकारी व पोलीस बंदोबस्त आणि शासकीय वाहन असल्याशिवाय उमरखेड उपविभागातील एकही तलाठी गौण खनिज कार्यवाही करणार नाही. असे निवेदन उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार उमरखेड यांना देण्यात आले.