बद्रीनारायण गलंडे
जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली : राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती बोगस करून पात्र उमेदवारांवर अन्याय करून आर्थिक व्यवहार करून उमेदवाराची निवड केल्याचा आरोप करीत या भरतीची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मुनीर खान पठाण यांनी केली असून, जिल्हा परिषदे समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरएनटी सीपीएस आणि एसटीएलएसबीटी पदभरतीमध्ये शासनाच्या नियमानुसार अपात्र उमेदवारावर निवड समितीने मेहरबानी करीत संबंधीतांना सेवेत दाखल करून घेतल्याचा आरोप मिवेदनात करण्यात आला आहे. माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीमध्ये गुणवता यादीमध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवाराचे इतरा सारखे अग्री गेट करून गुन न धरता अंतिम वर्षाच गुण दर्शविले . तसेच इतर पदविधारक उमेदवाराचे वैद्य संविधानिक पदविचे गुण दिले नाहीत. निवड केलेल्या उमेदवाराकडे महाराष्ट्र परावैद्यक परिषदेच्या अभियानांतर्गत नोंदणी क्रमांक प्रमाणपत्र नाही. तसेच प्रत्येक उमेदवाराची शैक्षणीक अर्हता एक सारखी न धरता वेगवेगळी धरण्यात आली. मुलाखती वेळेस इतिवृतात दिलेले गुण आणि शेवटच्या अंतिम यादीत संचीकेत दिलेले गुण वेगवेगळे आहेत . त्यामुळे या सर्व भरतीची सखोल चौकशी करून संबंधीतांवर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करावी या मागणीसाठी मुनीर पठाण यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.


