दिगंबर तेलंगे
कंधार तालुका प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील बाचोटी येथे गेल्या मागे अनेक वर्षापासून खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचा भव्य फड भरवण्यात येत असते त्याचप्रमाणे याही वर्षी दिनांक 20 12 २०२३ रोजी कुस्त्यांच्या भव्य फड भरवण्यात आला.
व तसेच या कुस्तीच्या फडाचे उद्घाटन नांदेड जिल्हा परिषद चे माजी सदक्षे विजय पाटील धोंडगे व उमाजी पाटील धोंडगे स आलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
व तसेच या फडातील कुस्तीचे प्रथम बक्षीस अच्युत टरके व द्वितीय बक्षीस परमेश्वर बामणीकर व तृतीय बक्षीस दिलीप बामणीकर यांनी पटकावले.
तर या फडा मध्ये कुस्त्या खेळण्यासाठी नांदेड जिल्हा व जालनास अनेक ठिकाणहून पैलवान दाखल झाले होते.
तर या फडातील कुस्त्यांना दुपारी दोन वाजता सुरुवात करण्यात आली. या फडातील कुस्ती लावणे व कुस्ती निकाली काढण्यासाठी पंच म्हणून जगन धोंडगे, ज्ञानेश्वर झंपलवार, यशवंत धोंडगे, संभाजी हसन वाढ, उमाजी पाटील धोंडगे, रघुनाथ पाटील धोंडगे, मारुती इबितवार, सुभाष धोंडगे, विश्वंभर धोंडगे, गोविंद यवते, संभाजी धोंडगे, यांनी पंच म्हणून काम पाहिले. या फडातील कुस्त्यांचा आनंद घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यास अनेक ठिकाणी प्रेषक मंडळी मोठ्या प्रमाणात कुस्त्यांच्या फडात उपस्थित झाले होते. तर या कुस्त्यांचा फड शांततेत पार पाडण्यासाठी नांदेड जिल्हा परिषद चे माजी सदक्ष विजय पाटील धोंडगे व यात्रा कमिटी व गावकऱ्यांनी या वेळेस मोठा परिश्रम घेतला होता


