गजानन डाबेराव
ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा:-नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदार यांना ११ डिसेंबर रोजी निवेदन सादर करण्यात आले. नांदुरा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले असून शासनाच्या सर्वेक्षणात संबंधित तलाठी यांच्याकडून बरेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे यादीतून सुटलेले असून यामुळे शासनाच्या मदत लाभांपासून वंचित राहिलेले आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांचे सर्वे करून मदत देण्यात यावी. तसेच केवायसी यंत्रणा अद्यावत करणारी वेबसाईट बंद असल्यामुळे अनेक शेतकरी शासनाच्या लाभांपासून वंचित राहू शकतात. एकही शेतकरी लाभांपासून वंचित राहू नये. बंद पडलेली केवायसी वेबसाईट सुरू करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अन्यथा 20 डिसेंबर पासून नांदुरा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अजाबराव वाघोदे जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट सदानंद ब्राह्मणे तालुका उपाध्यक्ष रमेश ठाकरे सुनील खंडेराव दिलीप वाकोडे अजाबराव गाडे सुधाकर तायडे मिलिंद जाधव यांच्यासह अनेक अनेक कार्यकर्त्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.


