अमोल सावंत
तालुका प्रतिनीधी
दि.12 डिसेंबर सविस्तर व्रत्त असे की केज तालुक्यातील मौजे राजेगांव येथील सकल मराठा बांधव मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या बोरीसावरगांव सभेसाठी सकाळी ठिक 08:30 वाजता तयारी केली .अतिशय उल्हासात लहान थोर मंडळी नी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.विशेषतः तरूण मिञमंडळ यांनी निष्ठेने या सभेला हाजर राहून आपल्याही गावाचा काही सहभाग म्हणुन सभेसाठी येणार्या सर्व बांधवासाठी नाष्टा पाकीट तब्बल पाच हजार तयार करून छोटा हत्ती गाडी रवाना केली. एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षरण मिळालंच पाहीजे या घोषणा देत सर्व मराठा बांधव बोरीसावरगांव च्या सभेसाठी रवाना झाले आहेत.त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी गावातुन एक टन झेंडुची फुले घेउन रवाना झाले आहेत. फुले तोडण्यासाठी लहान थोर मंडळीने सहकार्य केले त्यामुळे गावातुन त्यांचे फार कौतुक होऊ लागले आहे.


