कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील श्री संत सोनाजी महाराज यात्रेला सोमवार पासून प्रारंभ झाला दि.27 नोव्हेंबर ला पालखी मिरवणूक काढण्यात आली.तसेच मंगळवार दि.28 नोव्हेंबर रोजी मंगळवार ला रात्री बारा वाजता भव्य रथोत्सवाला सुरुवात होत आहे.याचे नियोजन रथोत्सव स्वयंमसेवक व सर्व गावकरी करत असतात.सर्व गावातून रथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. दि.29 नोव्हेंबर बुधवार यात्रेचा मुख्य दिवस असून भागवत समाप्ती व काल्याचे कीर्तन ह.भ.प.श्री.मधुकर महाराज साबळे यांचे राहणार आहे.असे श्री प्रकाश बांधिरकर यांनी सांगितले. दहीहंडी सोहळा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम श्री संत सोनाजी महाराज मंदिर येथे राहणार आहे हजारो भाविक भक्त यात्रेत दाखल झाले आहेत .सोनाळा येथे दरवर्षी श्री संत सोनाजी महाराज यात्रा महोत्सव साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे सोनाजी महाराजांच्या रथाची मिरवणूक रात्री बारा वाजता पासून सकाळी १२ वाजता रथ हा नियोजित जागेवर येतो यावेळी हजारो भाविक भव्य दिव्य रथ स्वतः ओडतात त्यानंतर ठीक बारा वाजता भजनी व टाळ मृदंगासह गोविंदा गोविंदा सोनाजी महाराज की जय अशा घोषणा देत दहीहंडी व काल्याचा कार्यक्रम संपन्न होतो.त्यानंतर दुपारी एक वाजेपासून श्री संत सोनाजी महाराज मंदिरामध्ये महाआरती होते. आरती झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. यामध्ये उडदाची डाळ व अंबाडीची भाजी असा महाप्रसाद दरवर्षी राहत असतो. यवरशी पाऊस असल्याने महाप्रसादचा कार्यक्रम श्री संत सोनाजी महाराज हायस्कूल येथे राहणार आहे.अशी माहिती श्री संत सोनाजी महाराज यात्रा विश्वस्त मंडळ यांनी दिली आहे.प्रसादाचे वितरण करण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व भावी भक्त व अनेक मंडळे सहभागी होत असतात यात्रा शांततेत पार पाडावी याकरिता सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील व पोलीस कर्मचारी प्रयत्नरत असतात. सर्व भाविकांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये कोणतीही संचयस्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास पोलिसांसोबत संपर्क साधावा असे आवाहन सोनाला पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.









