संतोष पोटपिल्लेवार
शहर प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- धनगर समाजाला एस. टी. मध्ये आरक्षण देऊन समाजाला न्याय द्या. या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने घाटंजी नायब तहसीलदार होटे साहेब यांच्या मार्फत राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. धनगर समाजाचा एस. टी. जाती मध्ये समावेश करण्यात यावा. या मुख्य मागणीसाठी अनेक वेळा निवेदने व आंदोलने व मोर्चे काढले. यापूर्वीच्या सरकारने सकारात्मक विचार करून पाठ पुरवठा केला. परंतु तरीही समाजाच्या आरक्षणाबाबत कोणत्याही हालचाली झालेल्या दिसत नाहीत.महाविकास आघाडी सरकारने धनगर समाजाच्या भावना समजून घेवून आरक्षणाबाबत सकारात्मक विचार करून धनगर समाजाला एस. टी. आरक्षणाची मागणी मंजूर करून धनगर समाजास एस. टी. आरक्षण देवून समाजास न्याय द्यावा अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी धनगर समाज घाटंजी शहर अध्यक्ष विवेकभाऊ घोडे, उपाध्यक्ष मुकेशदादा चिव्हाणे, बंडुजी गंडे, विकास तुराळे,रवि चिव्हाणे,अमोल शेंडे व इतर धनगर समाज बांधव उपस्थित होते.