संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
दौंड तालुक्यातील एकेरीवाडी गावामधील मा.उपसरपंच अर्चना महारनवर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सोमवार दि २० रोजी निवड प्रक्रिया घेण्यात आले यामध्ये निर्मला टुले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली .यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक नीलकंठ गायकवाड व अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच विद्याताई टुले यांनी निर्मला टुले यांची उपसरपंचपदी निवड झाल्याची घोषणा केली.यावेळी सतीश टूले,संजय टकले,गंगाराम टूले,प्रवीण टूले,गणेश महारणवर ,सुनील भिसे, महेंद्र टूले, मल्हारी टूले सुधीर टूले, गणेश शेळके, अमोल शेळके आधी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांकडून नवनियुक्त उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला…