रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
शेगाव येथे आज संपन्न झालेल्या राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी, अधिकारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या प्रथम राज्यस्तरीय अधिवेशनात श्री महेंद्र कराळे सर यांना डॉ.पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे,नागपूरचे आमदार अभिजित वंजारी,पदवीधर आमदार सुधाकर अलबाड,आमदार आकाश दादा फुंडकर, अनंतराव भारसाकळे, डॉ.संदिप डवंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


