रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड येथील अली क्लिनिक मध्ये रविवार 27 नोव्हेंबर 2023 रोजी निशुल्क भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार चे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर सय्यद वाजिदअली
यांनी आयोजित केलेल्या सदरहू शिबिराचे कार्यक्रमा त अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संग्रामभाऊ गावंडे,शिबिराचे उद्घाटक संजय ज्ञानदेवरावं गिऱ्हे सर , तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक प्रदीप ढोले सर , रामभाऊ म्हैसणे , राजू भाई खान हे लाभणार आहेत. शिबिरात मधुमेह, मेंदू रोग, किडनी, श्वसन विकार तज्ञ डॉक्टर ऋषिकेश येऊल , नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शत्रुघ्न जाधव , होमिओपॅथी चे डॉक्टर असलम अली , डॉक्टर शहजाद खान हे डॉक्टर रुग्णांची तपासणी करतील. मोफत आरोग्य शिबिरात आपली नाव नोंदणी करण्याकरता शिबिराचे आयोजक डॉक्टर सय्यद वाजीद अली तसेच धनंजय गावंडे , अवेज खान , मुजाहिद अली , विकास गायकी पाटील, सय्यद वकार अली , नाशिद अली, शेख शहजाद यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अली क्लिनिकचे संचालक डॉक्टर सय्यद वाजिद अली यांनी केले आहे.