पंकज चौधरी
तालुका प्रतिनिधी रामटेक
रामटेक पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खुमारी ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या ६० वर्षीय महिलेचा मोटारसायकलस्वाराने जोरदार धडक दिल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे,ही घटना दि.२० नोव्हेंबर ला सायंकाळी ७.३० वाजता घडल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार,मृतक प्रेमाबाई सहादेव पाली या सायंकाळी साडेसातच्या सुमारास नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ ओलांडत होत्या. दरम्यान, या महिलेला देवलापार कडून नागपूर कडे जाणाऱ्या मोटारसायकल क्रमांक एम.एच.४९ सी.बी.५९६५ यावर बसलेल्या तीन अल्पवयीन मुलांनी जोरदार धडक दिली, यामध्ये त्या महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना रामटेक उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारानंतर तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती रामटेक पोलीस ठाण्याचे ठाणेदार हृदयनारायण यादव यांनी दिली. तर रामटेक पोलिसांनी मृतांच्या कुटुंबीयांवर केलेल्या मारहाणीबाबत काँग्रेस नेते उदयसिंह यादव यांनी पोलीस प्रशासनावर सवाल केला आहे.









