करामत शाह
ग्रामीण प्रतिनिधी, आगर
आगर : अकोला तालुक्यातील आगर येथील मुस्लिम बांधवांनी मलंग शाह बाबा दर्ग्यावर 19 नोव्हेंबर रोजी संदल यात्रा मोठ्या उत्साहात काढली .या यात्रेत परीसरातील अनेकांनी सहभागी होऊन हिंदु मुस्लिम एकतेचे दर्शन घडविले पोलीसांनी सुद्धा चोख बंदोबस्त ठेवला होता.आगर येथील साबीर शाह कासम शाह यांच्या घरापासून रविवारी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान संदल यात्रा काढण्यात आली ही यात्रा पुर्ण गावातुन वाजत गाजत मलंग शाह बाबा दर्ग्यापर्यंत घोड्याच्या सवारीसह आली. या संदल यात्रेचे आयोजक साबीर शाह कासम शाह ,सलीम पांडे ,अब्दुल पांडे ,नासीर पांडे,रउफ शाह ,दाउद शाह, शेख इमाम कुरेशी ,शरीफ शाह ,शेख अफसर कूरेशी ,महेबुब शाह प्रमोद देंडवे ( जिल्हा अध्यक्ष वंचित बहूजन आघाडी) जिवन वानखडे,सूरेश सनगाळे ,ज्ञानेश्वर काळणे ,पंकज काळणे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.या यात्रेत अनूचित प्रकार घडू नये यासाठी उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आले. बिड जमदार मूळे ,निखिल माळी,पोलीस पाटील कल्पना ताई सिरसाट पत्रकार करामत शाह आदींची उपस्थितीत होती