गजानन वानोळे
ग्रामीण प्रतिनिधी, किनवट
किनवट तालुक्यातील इस्लापूर जलधरा शिवणी या भागामध्ये हजारो हेक्टर शेती असून , शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील पेरण्या नुकत्याच झाल्या आहेत, कोमजलेले पीक जमिनीच्या वर तोंड काढले असता, वीज वितरण कार्यालय इस्लापूर येथून वीज वितरण नियमित पुरवठा असून, परंतु शेतकऱ्यांनी कमी वीज पुरवठा मिळत असून या भार नियम लोड शेडिंग असल्याने रब्बी हंगामातील गहू , हरभरा , मक्का , तीळ , ऊस इत्यादी पिके तसेच वीज पुरवठा कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मोटार बंद राहत आहेत. त्यामुळे पिकाला पाणी कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे पिके वाळून जात आहेत.
तसेच भारनियम व लोड शेडिंग मुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्री बे रात्री शेतात. जाऊन पाणी द्यावे लागत आहे. तालुक्यातील बहुतांश भाग डोंगराळ व जंगलमय असल्याने जंगलातील हिंस्त्र प्राण्याकडून रात्री बे रात्री जीवघेणे हल्ले होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा करावा. अन्यथा सर्व शेतकरी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे निर्गुण पाटील सुभाष वानोळे यांनी महावितरण कार्यालय कनिष्ठ अभियंता इस्लापूर येथे दिला आहे. यावेळी शिवाजी बोडेवाड रमेश बोडेवाड चंदकांत पाकलवाड , श्याम साखरे बाळू बदुलवाड इत्यादी उपस्थित होते.