संतोष पोटपिल्लेवार
शहर प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- गेल्या अनेक वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यासह घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यावर अस्मानी व सुलतानी संकट येत आहे, त्यातच चालू खरीप हंगामात जून महिना कोरडा गेल्याने पेरण्या उशिरा झाल्या. जुलै – ऑगस्ट महिन्याच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस पिके पूर्णता चिबडली त्यातच सोयाबीन पिकावर येलो मोझाक आल्याने सोयाबीनचा उतारा एकरी दोन क्विंटल च्या आत आला, कपाशीला सुद्धा कमी बोंडे धरल्याने कापसाची सुद्धा उलंगवाडी झालेली आहे . अशी विदारक सत्य परिस्थिती असताना सुद्धा तालुक्यातील महसूल प्रशासन, तालुका कृषी विभाग, कृषी पिक विमा कंपनी या संपूर्ण बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे.बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके यांच्या वाढलेल्या अमाप, भरमसाठ किमतीमुळे आधीच मेटाकुटीस आलेला शेतकरी चालू खरीप हंगामात असमानी व सुलतानी संकटाने पूर्णता बरबाद झाला आहे. या सर्व शेतकऱ्यांना दिलासा व आर्थिक लाभ शासना कडून मिळणे अपेक्षित असताना राज्य शासनाकडून नुकतीच दुष्काळीची यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये घाटांजी तालुका पूर्णता बाद करण्यात आला, यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे याच अनुसंगाने तालुक्यातील हवालदिल शेतकऱ्यांच्या मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालय घाटंजी येथे अर्ध नग्न होऊन आंदोलन करण्यात आले. यामध्ये घाटंजी तालुका दुष्काळ जाहीर करावा,पीक विम्याचा लाभ सरसकट देण्यात यावा,नियमित कर्ज भरणाऱ्या वंचित शेतकऱ्यांना तात्काळ ५० हजार रुपये सानुग्रह निधी देण्यात यावा, कापसाला १२ हजार रुपये व सोयाबीनला ८ हजार रुपये बाजार भाव मिळवून द्यावा, असे निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संघपाल भाऊ कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग निकोडे, तालुका पदाधिकारी निलेश कडू , प्रकाश खोडे, नितीन राठोड,गणेश राठोड, मंगेश धुर्वे,संदीप सुरपाम,कपिल चौधरी, दिपक घोलप, प्रवीण बनसोड,रोहन दुल्हरवार, रा.वी.नगराळे रोशन आत्राम,अजिंक्य आत्राम,सौरभ सुरपाम, वीरेंद्र पिलावन, गौरव शेंडे इत्यादी हजर होते.