रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा हिवरखेड व ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना व्यवहारा करिता क्यू आर कोड वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत उलाढाल करताना त्यांना सोयीस्कर व्हावे या उद्देशाने हिवरखेड जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक आशिष ठाकरे यांचे हस्ते एकूण पाच ग्रामपंचायतींना पेटीएम क्यू आर कोड मशीनचे वाटप करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात शाखाधिकारी आशिष ठाकरे , सुशील गायकवाड , दत्तराज गोसावी , मोहन राठोड , अभिषेक शीत्रे , रणवीर आर्य आदींची उपस्थिती होती. माझी बँक जिल्हा बँक याला अनुसरून नेहमी हिवरखेड जिल्हा बँक ही नवनवीन उपक्रम येथे राबवित असते असे मनोगत शाखाधिकारी आशिष ठाकरे यांनी व्यक्त केले.