अमोल सावंत
तालुका प्रतिनीधी केज
दि.20 केज वनक्षेत्रपाल कार्यालयात आज केज तालुक्यातील दहा ते बारा पत्रकार बांधवानी भेट दिली.प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहीली तर चक्क वनमजुरावर सर्व कार्यालयाचा कारभार चालु आहे .एकुण आठ कर्मचार्या पैकी श्री.शेवाळे सर (वनक्षेत्रपाल) ,तागड सर,जाधव सर,जायभाय सर ,मोराळे मॕडम ,गायकवाड मॕडम शिपाई यांचा रितसर लेखी रजेचा आर्ज ,एम.जी.लामतुरे ,हे सर्वच अनुउपस्थीत दिसले.त्यानंतर बरेच महापुरूषांचे फोटो भिंतीकडे तोंड करुन तर काही टेबल खाली ज्या ठिकाणी अधिकारी बसल्यानंतर त्यांचे बुटासहीत पाय त्या फोटोकडे जातात .आॕफीसमध्ये भिंतीकडे पाहील्यानंर असं निदर्शनास आले की फोटो भिंतीला लटकवलेले होते परंतु असे का ठेवले आहेत हा प्रश्न पत्रकार बांधवाच्या लक्षात आला.लागलीच सर्वानुमते विचारविनीमय करुन केज तहसील चे नायब तहसीलदार धस साहेब यांच्याशी संपर्क केला ,त्यानंतर केज पोलीस स्टेशन चे पी आय पवार सर यांच्याशी संपर्क केला त्यांनी लागलीच त्यांचे सहकारी पी आय पाटील सर यांना वनक्षेत्रपाल कार्यालयाकडे शहानिशा करण्यासाठी पाठवले व त्यांनी सर्व पत्रकारबांधवाच्या समोर आॕफीसची आवस्था पाहीली .आठवड्याचा पहीला दिवस कामकाजाचा मानला जातो पण वनक्षेत्रपाल कार्यालयात एका वनमजुरावर आॕफीस ची जबाबदारी ठेवुन सर्व अधिकारी वर्ग बेपत्ता आहे ही शोकांतीका आहे.महाराष्ट्र शासन जनतेच्या सेवेसाठी आॕफीस ,कर्मचारी पगार देऊन ठेवतात पण अधिकारी आॕफीस देखील संभाळु शकत नाहीत कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र या बाबीकडं प्रशासनाने बारकाईने लक्ष द्यावे अशी भावना जनतेच्या मनात येत आहे.


