वेदांत ओव्हाळ
ग्रामीण प्रतिनिधी, कळमोली
दिनांक 20-11-2023 रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये सुनीताने नामदेव गोपाळ यांचा एकमेव फॉर्म आल्याने त्यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाली. खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम विभागाचे युवकचे उपाध्यक्ष नामदेव शंकर गोपाळे यांच्या यांच्या त्या पत्नी आहेत .गेल्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये माजी सरपंच सौ हेमलता बजरंग गोपाळे या कार्यरत होत्या परंतु निवडणूक वेळी ठरलेल्या समजू त्यानुसार सर्व हेमलता गोपाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्यानुसार आज झालेल्या सभेमध्ये सुनीता नामदेव गोपाळे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कुडा मंडळाचे मंडलाधिकारी सर्व योगिता पिंगळे यांनी सुनीता नामदेव गोपाळे यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कळमोडी ग्रामपंचायत ग्रामसेवक एमडी देवाडी भाऊसाहेब यांनी काम पाहिले ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी योगेश नवले त्याचबरोबर राजू शेठ गोपाळे ,सुदामराव पवार, दिगंबर गोपाळे ,उपसरपंच नंदकुमार अभंग, गणेश पवार, यशवंत गोपाळे, तुकाराम नवले, मुरलीधर नवले, भिमाजी गोपाळे व सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न केले त्याच बरोबर उद्योजक बजरंग शेठ गोपाळे व पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे विद्यमान संचालक अरुण शेठ चांभारे, माजी सरपंच हेमलता गोपाळे यांनी विशेष प्रयत्न केले.