बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड: खानवटे ता. दौंड येथील संजय वाल्मिक गायकवाड यांची मुलगी कु.चंचल गायकवाड हिचे पुणे येथे अपघाती निधन झाले होते. यासंदर्भात दौंड चे माजी आमदार आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मा.चेअरमन वि. संचालक रमेश थोरात यांनी खानवटे येथे गायकवाड कुटुंबियांची भेट घेतली.आणि कुटुंबाला आधार देत त्यांचे सांत्वन केले.संजय वाल्मिक गायकवाड हे गेली 12 ते 15 वर्षे दौंड येथील एस आर पी एफ मध्ये कार्यरत होते. आणि सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलात असून ते पुणे येथे आज रोजी कार्यरत आहेत. त्यांना एकच मुलगा कपील असुन आणि एकच मुलगी होती यातील कुमारी चंचल गायकवाड हिचा पुणे शहरात मोटरसायकल वरती अपघात झाला होता. त्यामध्ये तिचा अपघाती दुर्दैवी अंत झाला.यावेळी रमेश थोरात यांनी त्यांची खानवटे येथे भेट घेतली. त्यांचे बरोबर दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती उत्तमराव आटोळे, खानवटे गावचे माजी सरपंच अशोकराव गायकवाड,खानवटे विकास सोसायटीचे माजी चेअरमन उदयराजे भोसले, माजी ग्रामपंचायत सदस्य सतिश लोंढे, उपसरपंच अर्जुनराव गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते बापूराव थोरात, राहुल पोटफोडे, विलास जाधव,सौरभ भोसले,रमेश गायकवाड इत्यादी उपस्थित होते.