अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
शेवटच्या टोकाला, मराठवाड्याच्या सीमेवर, यवतमाळ जिल्ह्याची श्वासवाहिनी असलेला, पैनगंगा अभयारण्य परिसर, ढाणकी व बंदी भाग. या विभागातील निसगार्चा अनमोल नजराना सर्वपरिचीत आहे. निसर्ग जरी या विभागावर मेहरबान असला तरी, या विभागाला आजपर्यंत लाभलेले नेते मात्र कुरतडून खाण्यातच व्यस्त असल्याचे दिसत आहे. कारण एवढा नैसर्गिक संपन्न भाग असतानाही, आजही या बंदी भागातील रस्त्यांची दुरावस्था अत्यंत बिकट असून, या अभयारण्यातील काही गाव खेड्याला जायला आज सुद्धा रस्ताचं नाही. त्यामुळे येथील नागरिकांचे प्रचंड बेहाल असून, आज पर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीने या विभागाला विकासापासुन वंचित का ठेवले
पैनगंगा अभयारण्यातील वनौषधीला जागतिक मार्केट उपलब्ध करून देण्यात आमदार महोदय आजपर्यंत पुढे का नाही आले ? कारण गेल्या चार वर्षात या विभागात आजपर्यंत रोजगार, शिक्षण, रस्ते, शेतीतील व्यावसायिक प्रयोग किंवा येथील पारंपरिक उद्योग या मूलभूत प्रश्नावर आत्तापर्यंत किती काम झाले? आता राहिलेल्या वर्षभरात काय काय होणार? देवालाच ठाऊक. त्यामुळे अशा नेते मंडळींची सामान्य नागरिकाचे मूलभूत प्रश्न सुटावेत यासाठी काम करण्याची इच्छा नसून, केवळ आणि केवळ स्वतःचा उत्कर्ष कसा साधता येईल? यासाठीच ही नेतेमंडळी असल्याकारणाने, आजही ढाणकी व बंदी भाग विकासापासून कोसो दूर असल्याची संतप्त चर्चा नागरिक करताना दिसत आहेत.