सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. १४ नोव्हेंबर २०२३ मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांमध्ये घुसखोरी करत काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण देण्यात आले या प्रकरणी बीड पोलिसांनी आत्तापर्यंत केलेल्या कारवाईत १८१ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यापेक्षाही जास्त जाण्याची ओळख पटवली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मराठा समाजातील तरुण आंदोलन करत असताना या आंदोलनाचा फायदा घेत बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण देण्यात आले. आंदोलने चालू असताना अज्ञात व्यक्तींनी या आंदोलनात घुसखोरी करत बीड जिल्ह्यातील राजकीय पक्षाचे नेते लोकप्रतिनिधी, शासकीय आणि खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. जिल्ह्यातील अनेक भागात दगडफेक जाळपोळ करण्यात आणि या हिंसाचारामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला. या हिंसाचारात जबाबदार असणाऱ्या लोकांनावर बीड पोलिस प्रशासने गंभीर गुन्हे दाखल केले असून. आत्तापर्यंत याप्रकरणी पोलिसांनी १८१ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. काही आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी बीड पोलिस प्रशासनाने ४०० जणांची ओळख पटवली असून बीड जिल्ह्यात घडलेल्या हिंसाचार प्रकरणी आरोपींच्या संख्येत वाढ होत आहे.


