अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी,तलासरी
डहाणू :- आज दि. १२ नोव्हेंबर २०२३ रोजी, KD (नॉलेज डेव्हलपमेंट) ग्रुप आयोजित आंबिवली (खडकीपाडा) येथे दिवाळीच्या निमित्ताने विविध स्पर्धा, बक्षीस वितरण, सत्कार समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. सदर विविध स्पर्धेमध्ये वकृत्व (भाषण) स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, निबंध स्पर्धा, तळ्यात मळ्यात स्पर्धा आणि पत्रलेखन स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत आंबिवली, सारणी, निकावली, म्हसाड, उर्से, साये आदी गावातील लहान मुलांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत ई २ री ते ४ थी, ५ वी ते ८ वी आणि ९ वी ते १२ वी असे तीन गट तयार करण्यात आले होते. या तीन गटातून प्रथम, दृतीय आणि तृतीय क्रमांक काढून त्यांना मान्यवरांच्या हस्ते KD ग्रुप कडून प्रमाणपत्र आणि बक्षीस म्हणून वही आणि पेन प्रोत्साहन पर देण्यात आले. तसेच ज्या मुला – मुलींनी गेल्या वर्षी इ. १० वी व इ. १२ वी या वर्गात उत्तीर्ण झाले म्हणून त्यांचा ही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक आणि सत्कारमूर्ती म्हणून डॉ. योगेश भगत उपस्थित होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून वकील विराज गडग, पंचायत समिती सदस्य आणि माजी सभापती सौ. स्नेहलता सातवी मॅडम, आदिवासी कवी श्री. मोहन गुहे, श्री. सुरेश बेलकर (ओसरविरा शाळा – मुख्याध्यापक), डॉ. दर्शना गडग, विवळवेढे सरपंच श्री. नितेश भोईर, श्री. अरविंद बेंडगा आदी तसेच मिरा भाईंदर पोलिस येथे आताच नियुक्त झालेले श्री. विकास गांगड आणि पालघर पोलिस म्हणून नियुक्त झालेले जयेश अलोने उपस्थित होते. त्यांनी उपस्थित सर्व मुलांना आणि पालक वर्गाला खूपच सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केले.सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शाळकरी मुलांनी खूपच उत्साहपूर्वक सहभाग नोंदवला होता. सर्वांनी खूपच छान आपापल्या कसे असणारे टेलेंट यांनी या कार्यक्रमात दाखवले होते. या कार्यक्रमात आंबिवली तसेच आजूबाजूच्या गावातील उपस्थित मुले – मुली व पालक वर्ग उपस्थित होता.