अनंत कराड
तालुका प्रतिनिधी पाथर्डी
काही दिवसापूर्वी लोकनेते माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे दुःखद निधन झाले. आभाळा एवढा दुःखाचा डोंगर ढाकणे कुटुंबावर कोसळला असून सुद्धा प्रताप ढाकणे काल ऊस तोडणी कामगारांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळीच्या दिवशी ऊस तोडणी कामगाराच्या भडामधे जाऊन ऊस तोडणी कामगार व त्यांचे लहान मुले यांची दिवाळी गोड करण्याचे काम प्रताप ढाकणे यांनी केले यामुळे समाजामधून त्यांचे कौतुक होत आहे.


