अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मॉनिटर या अभिनव उपक्रमासाठी अकोला जिल्ह्यातून किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल या एकमेव शाळेची निवड झाली.यावेळी या शाळेला अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला.मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे पार पडलेल्या कार्यक्रमात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर साहेब व सिनेकालांवत प्रेम चोपडा यांच्या उपस्थितीत विद्यार्थी व समन्व्यक यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओल, संयुक्त सचिव इम्तियाज काझी, डॉ. शरद गांधी, स्वच्छता मोॅनिटर चे राज्य समन्व्यक रोहित आर्या आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमात शाळेचे संस्थापक गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ ज्योत्स्ना गाडगे, शिक्षक अविनाश पाटील, स्वच्छता मॉनिटर अमृता शेंडे, श्रावणी गिऱ्हे, व अंकित पाटील आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या किड्स पॅराडाईज च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.मुंबई येथे अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवल्याबद्दल पातूर शहरातील अनेक मान्यवरांनी शाळा व विद्यार्थी यांचा सत्कार केला. पातुरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी बाब असून या निवडीचे स्वागत पातूर शहरातील अनेक मान्यवरांनी केले.