सोहेल खान
शहर प्रतिनिधी, पांढरकवडा
पांढरकवडा :- बेलदार व तत्सम जमाती समाज संघटनेच्या वतिने महिला भगिनींचा बत्तकमा सण साजरा करण्यात आला.बत्तकम्मा म्हणजेच गौरी पुजन फुलांच्या माळा सजवुन त्यावर दिवा लावुन महिला पुजन करतात व भोवती विविध गाणे म्हणत फेर धरत नृत्य करत वाजत गाजत आनंद साजरा केला जातो.प्रामुख्याने तेलगु भाषिकांचा हा सण दक्षिण भारतात खुप प्रचलित आहे विशेष म्हणजे विदर्भातील यवतमाळ जिल्हा तेंलगाणा सीमे लगतच्या भागात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.पांढरकवडा नगरीत प्रथमच तेलगु भाषिक बेलदार मुन्नुरकापु समाजाच्या महिलांनी मोठ्या उत्साहात सहभागी होवुन साजरा केला.मुख्यरस्त्यावरुन रॅली काढण्यात आली चौका चौकात महिलांनी बतकम्मा गीत म्हणत विशिष्ठ पद्धतीने नृत्य सादर करुन सर्वाचे लक्ष वेधले.यासाठी समाजाचे नेते मा.श्री.के जी.मुत्यालवार,संदिप पदलमवार,प्रशांत कर्लावार यांचे संकल्पनेतुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शहरातील सुमारे दोनशेचेवर परिवारांनी सहभागी होवुन समाज एकात्मतेचे दर्शन घडविले.रॅलीत माजी शहराध्यक्ष सौ वैशाली ताई नहाते ह्या सहभागी झाल्या त्यांचे स्वागत सौ,दिपाली पदलमवार,सौ नव्या कर्लावार यांनी केले,रॅलीत सहभागी महिला भगिनींना दुध फळे नास्त्याची व्यवस्था करण्यात आली.ह्यासाठी प्रांतिय सदस्य अरविंद गांगुलवार,विनायक वद्देवार,क्रिष्णराव आदेवार,क्रिष्णराव देशट्टीवार,डाॅ.सुरेश निलमवार.हनमंतु रजनलवार.जयवंत वल्लमवार.रामकृष्ण पार्लावार.प्रभाकर चुक्कलवार.रमेश पंडलवार इतर सर्व समाज बांधवानी परिश्रम घेतले


