अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
भारत हा कृषिप्रधान देश असून देशातील 70 टक्के पेक्षा अधिक जनतेचे उदरनिर्वाहाचे साधन शेतीच आहे, अशा महत्त्वाच्या व्यवसायाचे पारंपारिक पद्धतीने कामकाज करणे व अधिक पीक घेणे याशिवाय पारंपारिक पद्धतीतून इतर पद्धतीचा अवलंब व्हावा आणि साधनसामग्रीचा योग्य वापर करून शेतीतील पीक अधिकाधिक घेऊन स्वतःचा व देशाचा विकास होवोत याच अनुषंगाने डॉ पंजाबराव उभा के भाऊसाहेब देशमुख यांनी 1952 साली दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले व त्या प्रदर्शनीमध्ये विविध देशातील शेतीपूरक साधनांची माहिती देण्यात आली व त्या प्रदर्शनीने देशातील जनतेला अधिक फायदा झाला, सोबतच ग्रामीण भागात शिक्षणाची किती महत्त्व आहे व ग्रामीण विद्यार्थी शिकणे गरजेचे आहे या अनुषंगाने शिक्षणाची गंगा दारोदारी पोहोचवणारे शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी 1932 ला श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीची स्थापना केली व शिक्षणाचे विविध दालने उभी केली, भारत कृषी समाजाची स्थापना, अस्पृश्यता निवारण इत्यादी क्षेत्रात भाऊसाहेबांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन एडवोकेट अमर देशमुख, यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना देण्यात आले, डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रोप महोत्सवी जयंती निमित्त 125 व्याख्यानाचा उपक्रम राबविण्यात येत आहे त्यापैकी एक व्याख्यान तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती पुणे चे प्राचार्य डॉ अविनाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली तथा डॉ. एच एन सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालय पातुर जी अकोला चे प्राचार्य डॉ.किरण एस खंडारे व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती पुणे चे उपप्राचार्य डॉ सचिन गडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी प्रमुख वक्ते ऍड अमर देशमुख पूसदेकर अभ्यासक तथा विश्लेषक पुणे हे होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे समन्वयक जनार्दन पवार व रोनिल आहाळे हे होते. प्रथमता डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे विचार घरोघरी पोहोचावे व यांचे विचार नवीन पिढीला प्रेरणा ठरावि ह्याच व्याख्यान घेण्यामागे उद्देश असल्याचेडॉ एच एन सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालय पातुर जी.अकोल्याचे प्राचार्य डॉ. किरण एस खंडारे यांनी आपल्या प्रास्तविकात नमूद केले, यावेळी सभागृहांमध्ये प्राध्यापक वृंद व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या उपस्थित होते या कार्यक्रमाचे परिसरात फार कौतुक करण्यात आले.