मधुकर बर्फे
तालुका प्रतिनिधी पैठण
पैठण: आमरापुरवाघुंडी रेशन दुकानदाराचा मुजोरपणा अरे वारीची भाशा रेशन कार्ड धारकांना वेळेवर व रितसर धान्य न देण्याचा प्रकार आमरापुर वाघुंडी येथील प्रकार समोर आला आहे.अशोक बाबुराव शहाराव यांनी तक्रार देऊन ही पैठण पुरवठा व तहसिलदार ठिम्म आहेत.यावर वरिष्ठांनी दखल घेऊन कारवाईची मागणी होत आहे.पैठण तालुक्यातील आमरापुर वाघुंडी या धरणग्रस्त खेड्यागावात बाहेरगावाची व्यक्ती स्वस्त धान्य दुकान चालवत असुन दुकान क्र.८४ चे मालक सोण्याबापु कुलकर्णी हे महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात फक्त तीन दिवस सकाळी आठ ते आकरा दरम्यान दुकान उघडी ठेवून माल वाटप करतात. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना कामधंदे बुडवून रेशन धान्य घेण्यासाठी थांबावे लागले दि.१६ सप्टेंबर रोजी एक लाभार्थ्यी रितसर रागेत थांबल्यावर राशन देण्या अगोदर दुकानदाराने सदर लाभार्थ्याचा रजिष्टरमध्ये दोन सह्या घेतल्या नंतर मशिनवर आंगठे ठेवले परंतु पावती निघाली नसल्याने धान्य देता येत नाही,नंतर ये असे बोलवुन मोफतचे धान्य व आनंदाचा शिधा न देता रिकाम्या हाती माघार पाठविण्यात आले दुकानावर दुकान क्रमांक फलक व नियमावली नाही लाभार्थ्यी गहू किती,तांदुळ किती येतात हे लाभार्थ्यांना समजत नसल्याने कमी धान्य देण्यात येते मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून दुकानदाराची चौकशी करुन कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अशोक बाबुराव शहाराव यांनी तहसिलदार यांना २५. सप्टेंबर रोजी तक्रारीत मागणी केली आहे.महिणा उलटून देखील कुठलीच कारवाई झाली नाही डार्क धारकास दोन महिण्याचे धान्य मिळाले नसुन लाभार्थ्याची उपासमार होत आहे. पुरवठा अधिकारी यांनी तात्काळ चौकशी करून कारवाई करावी नसता आमरण उपोषणास बसणार आसल्याचा ईशारा देण्यात आला आहे


