शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू :- शहरातील गुलमोहर कॉलनी येथे दिनांक 22/10/23 रोजी दुपारी 2वाजता शेख सुफियान शेख नाजेम तांबट करी वय वर्ष 6 हा खेळत असताना मोकाट कुत्र्याने त्याच्या शरीर वर चार ते पाच ठिकाणी चावा घेऊन जखमी केल्याची घटना घडली. नागरिकांनी लवकरच धाव घेऊन त्या मुलास कुत्र्याच्या तावडीतून सुटका करून उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय परभणी येथे रवाना करण्यात आले आहे. सध्या परिसरात मोकाट कुत्रे जास्त प्रमाणात झाल्यामुळे त्यांच्या त्रासामुळे लहान मुले व पालकां मध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे, या घटनेमुळे नगर परिषदेने लक्ष देण्याची मागणी नागरिकाकडून होत आहे. रात्री घरी येणारे, शाळा, टीव्हीशन व पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिक व विध्यार्थीच्या मागे कुत्रे धावतात. दुचाकी स्वारच्या पाठी मागे लागतात. यांचा बदोबस्त करण्यासाठी साठी गुलमोहर कॉलोनी नागरिक यांनी मुख्याधिकारी देविदास जाधव यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे व नगरपालिकेने तात्काळ पावले उचलून, कार्यवाही करून,मोकाट कुत्र्याना शहराबाहेर रवानगी करावी. अशी मागणी केली आहे. या निवेदनावर अब्दुल मजीद बागवान, शफिख अली खान,
नुरमोहंमद ईशानी, रहीमखान पठाण, निसार पठाण, शेख कौसरभाई, सत्तार भाई बागवान, अकबर खान पठाण, गौस भाई तांबटकरी, कदीर भाई बागवान, रहीम भाई टेलर, गौस भाई अन्सारी, हकीम कादरी, सय्यद जावेद, शेख इजहार, शेख निहाल, मौजम सर आदीच्या स्वाक्षरी आहेत.


