व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी : राज्यभरात पावसाळ्याचा जोर ओसरला असुन थंडीची चाहूल सुरू झाली आहे अशातच पितृछाया स्वंयसेवी संस्था तथा राजे फाउंडेशन तर्फे माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या शुभ हस्ते आलापल्लीतील गरजू व्यक्तींना ब्लँकेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमात राजे अम्ब्रिशराव महाराज बोलताना मी शब्दाचे पक्के, आणि आश्वासन देऊन मागे हटणे माझ्या स्वभावात नाही,लोकं मनापासून खूप प्रामाणिक असतात. आणि प्रेमळ सुद्धा, पण कोणाचेही हृदय दुखावण्याचा माझ्या रक्तातच नाही.मी नेहमीच इतरांना मदत करायला तयार असतोच असेही त्यांनी यावेळी म्हटले.यावेळी राजे अम्ब्रिशराव महाराजांनी नागरीकांचे समस्या जाणून घेतले. यावेळी पितृछाया स्वयंसेवी सस्टेनेबल अध्यक्ष श्री जयप्रकाश गोरखनाथ शेंडे, भाजपाचे अभिजीत शेंडे, मोहन मदणे ,फ्रॅक्लीन सलम, शहर अध्यक्ष, दिपक त्तोगरवार, अंकुश शेंडे, शहर उपाध्यक्ष, हर्षीद वर्मा,शहर उपाध्यक्ष, राजस्मीत पोचमपल्लीवार, सागर बिट्टीवार, शकुंतला दुर्गम , सुरेश तलांडे , सिनु नामणवार,मायाताई बासनवार, रापत्तीवार सर, जागृती कांन्नाबार तसेच भाजपा पदाधिकारी व मंडळाचे सर्व सदस्य, आलापल्लीतील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


