शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू :स्त्री म्हणजे शक्तीचं मूर्तिमंत रूप,स्त्री म्हणजे वात्सल्य,स्त्री म्हणजे ममता आणि प्रसंगी स्त्री म्हणजे दुर्गा.अश्या शक्तीरूपी दुर्गेच प्रतीक म्हणजेच नवरात्र.आज आधुनिकीकराणाच्या काळात स्त्री तीच परंतु तिच्या कार्यक्षेत्राच्या सीमा विस्तारल्या आहेत.अश्या विविध क्षेत्रात कर्तृत्व बजावणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान नूतन कन्या प्रशालेत नवरात्र महोत्सव आणि व्यवसाय मार्गदर्शन अंतर्गत स्त्री शक्तीचा जागर करूया
स्त्री शक्तीचा सन्मान करूया या उपक्रम अंतर्गत करण्यात आला.पहिल्या दिवशी आदर्श शिक्षिका, प्रशालेच्या मुख्याध्या पिका संगीता खराबे यांचा सन्मान करत दररोज एका स्त्री शक्तीचा सन्मान करत-
वैशाली टकले (डिझायनर)
शुभांगी देशमुख (कीर्तनकार)
अरुणा जाधव (उद्योजिका)
रुपाली आम्ले (वकील)
शुभांगी मोगल (कोतवाल) रत्ना तुपसमिंद्रे ( पोस्टमन)
सरोज पाजगे (आरोग्यसेविका)
पल्लवी मुंडीक (नृत्यांगना)
या कर्तृत्ववान महिलांचा प्रशालेच्या वतीने शाल,श्रीफळ, पुष्पहार, पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.या प्रसंगी प्रत्येक महिलेने आजपर्यंत चा प्रवास विद्यार्थीनी समोर उलगडला. प्रशालेच्या मुख्याध्या पीका संगीता खराबे, उपमुख्याध्यापक दत्त रावघोगरे,पर्यवेक्षक रोहिदास मोगल, सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापूरकर यांचा प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा दामा,कीर्ती राऊत यांनी केले तर आभार भालचंद्र गांजापूरकर यांनी मानले.
उपक्रमाच्या यशस्वीते साठी रेणुका अंबेकर, वैशाली चव्हाण,सुरेखा आगळे, सीमा सूक्ते, विजया खडके,ज्योती कुंभकर्ण, सपना पाटनी शशिकांत देशपांडे,सुनील मोगल यांनी सहकार्य केले.