कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पंधरावा वित्त आयोग अंतर्गत निधीतून केले नियोजन पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत आसोली येथे १५ व्या वित्त आयोगातून पाणी फिल्टर बसवण्यात आले आहे. मानवाच्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी किती आवश्यक आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. खेड्या पड्या मध्ये आजर वाढण्याचे मूळ कारण पाणी असते,बरेचसे आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. हि बाब हेरून ग्रामपंचायत ने पाणी शुद्धीकरण यंत्र बसवण्याचा निर्णय घेतला.दिनांक २०-१०-२०२३ रोजी सकाळी ११वाजता थाटामाटात उदघाटन करण्यात आले.पाणी फिल्टर चे उद्घाटन पुसद तालुक्यातील लाडके व्यक्तिमत्त्व मा. ययाती नाईक यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी माहिती अधिकार आयुक्त संभाजी सरकुंडे होते. कार्यक्रमाला तालुक्यातील बरीच मंडळी उपस्थित होती.वंचित बहुजन आघाडी पुसद तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, राजेश ढोले युवा ग्रामीण पत्रकार संघ पुसद ग्रामीण तालुकाध्यक्ष, अनिल धुळधूळे सरपंच जामबाजार,सुदाम चिरंगे सरपंच लोहरा इ,गजानन टारफे सरपंच हर्षी, अशोक चव्हाण,उपसरपंच चिकणी, संजयराव भोने सरपंच वेणी, गणेश भुजाडे सरपंच घाटोडी समाधान बळी अ.भा नौ.ज सभा तालुकाध्यक्ष,निकेश गाडगे पोफळी,अमरदीप चव्हाण उपसरपंच घाटोडी,पप्पू राठोड चिकणी, पत्रकार ज्ञानेश्वर मेटकर कैलास श्रावणे दैनिक अधिकार नामा पुसद, सोनू राठोड पोफाळी, उत्तमराव ढोले गौळ,संदीप जाधव पाळूवाडी,विक्रम मस्के दहिवड,आसोली ग्रामपंचायत चे सचिव इसळकर सर्व सदस्य,सरपंच आसोली व गावकरी मंडळी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.कोणताही आमदार, खासदार निधी नसतांना, राजकीय पाठबळ नसताना आसोली ग्रामपंचायत विकास करत आहे. आम्हाला निधी मिळाला तर आम्ही अधिक उत्स्फूर्तपणे कामे करू आम्ही दिलेले आश्वासने पूर्ण करण्यास मी कटिबद्ध आहे.पण निधी अभावी काम कसे करावे
यशवंत सुभाष कोल्हे
तालुकाध्यक्ष सरपंच सेवा महासंघ पुसद.


