अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी तालुक्यातील देवधरी येथे रविवार रोजी अष्टभुजा दुर्गोत्सव मंडळातर्फे एक दिवसीय भव्य मोफत रुग्ण तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 457 रुग्णांनी या शिबिराच्या लाभ घेतला. शिबिराचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते महेश ठाकरे यांनी केले होते.
या शिबिरात पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण लिंगाडे, घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन देशमुख पारवेकर यांनी भेट दिली.
विशेषतः ग्रामीण भागातील महिला व पुरुषांनी या रुग्ण तपासणी शिबिराला चांगली उपस्थिती दर्शविली. तसेच गावातील नागरिकांनी या शिबिराला बहुमुल्य असे सहकार्य केले. रुग्ण तपासणी शिबिराला अष्टभुजा दुर्गोत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते महेश ठाकरे यांनी दिली.


