गजानन ढोणे
ग्रामीण प्रतिनिधी बुलढाणा
स्थानिक जांभरुण रोड स्थित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय इंग्रजी माध्यम बुलढाणा येथे गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गरब्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला. पालकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाग घेतला. त्यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. सुशीलजी पनाड सहपरिवार उपस्थित होते. म.जो.फुले मंडळ सचिव इंजी. श्री.सुरेश चौधरी, म.फुले मराठी शाळा मुख्याध्यापिका श्रीमती स्नेहलता मानकर, सौ. कीर्ती चौधरी मॅडम उपस्थित होते. अदिती अर्बन कार्यकारी संचालक सुशील पनाड तसेच सौ.दिशागज मॅडम (पीच थेरपिस्ट) यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. तसेच श्री. गणपतसिंग राजपूत परिवारातर्फे नवदुर्गाचे स्वागत तसेच बक्षीस वितरण करण्यात आले.त्याप्रसंगी शाळेचे प्राचार्य मा. श्री. अविनाश सुरडकर, शिक्षिका कु.कविता भुसारी,कु.कविता शिरसाट, कु.राजश्री अवचार, कु. स्वाती पाटील,कु.सीमा जाधव,कु.संध्या चौथनकर, कु. प्रियंका सुरडकर,कु.विद्या बिडकर, श्रीमती कमल वैद्य कधी मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सीमा जाधव यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु.स्वाती पाटील यांनी केले.



