अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
अकोला : दि – १९ ॲाक्टोबर २०२३ दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सार्थक वक्तृत्व अकॅडमी व सिताबाई कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रोफेसर डॅा. एम. आर. इंगळे राज्यस्तरीय भव्य खुल्या वक्तृत्व करंडकाचे आयोजन रविवार दि २२ ॲाक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात केले आहे. गेल्या ९ वर्षापासुन स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले जात आहे. स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धक मोठ्या उत्साहात सहभागी होतात. स्पर्धेमध्ये १८ ते ३० या वयोगटातील चं स्पर्धक सहभागी होवु शकतात.देशात घडणाऱ्या महत्वाच्या घटनांवर तरुणांना अभिव्यक्त होण्यासाठी संधी देणे आणि विचार मंथनातून लोकशाहीवादी नागरिक निर्माण करण्यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे आहेत.तूझ्या पोटात दुखत असेल तर, माझं आरक्षण तू घे..तुझी जात मला दे, माझी जात तू घे…,
मणिपूरची धिंड आणि देशाचा पुरुषप्रधान पिंड,अंध होऊन दुर्गंध पसरविण्यापेक्षा, आम्ही अनुयायी झालो हे बरे..!, लोकशाही म्हणजे बहुमताची दडपशाही नाही., अतिदक्षता विभागात अर्थव्यवस्थेचा ‘बळी’राजा, भय पेरणाऱ्या राष्ट्रात मी निर्भय आहे. प्रत्येक स्पर्धकाला सादरीकरणासाठी 5+2 एकूण 7 मिनिटाचा कालावधी राहणार आहे.यातुन उत्कृष्ठ टॉप 20 स्पर्धकांची निवड उस्फुर्त फेरीसाठी करण्यात येणार आहे. त्यांना सादरीकरणासाठी 2+1 एकूण 3 मिनिटाचा कालावधी देण्यात येणार आहे.विजेत्या स्पर्धकांना खालील प्रमाणे बक्षिसे दिल्या जातील प्रथम क्रमांक 10,000/- रोख , ट्रॉफी व प्रमाणपत्र, द्वितीय 7,000/- रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र, तृतीय 5,000/- रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र चतुर्थ 3,000/- रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र, पंचम 2,000/- रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र, प्रोत्साहन पर १००० रुपयाची पाच बक्षीसे ट्रॉफी व प्रमाणपत्र दिल्या जातील.स्पर्धेच्या नोंदणीसाठी आदीत्य बावनगडे,ॲड.वैष्णवी हागोणे,अभय तायडे, अमित वाहुरवाघ यांच्याशी संपर्क साधावा.