शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू :विनोद बोराडे व मित्र मंडळाचा उपक्रम मोफत वाहन सुविधा नवरात्र महोत्सवानिमित्त गेल्या अनेक वर्षा पासून सेलू शहरातील सर्व महिला भगिनींना मंठा येथील श्री जगदंबा मातेचे दर्शन घडावे,या उद्धेशाने माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे व मित्र मंडळाच्या वतीने गुरुवार पासून (दि. 19 ऑक्टो.) श्री जगदंबा माता दर्शन यात्रा सुरु होत आहे. याचा अधिकाधिक महिला भक्तानी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. पाचव्या माळेपासून ते आठव्या माळेपर्यंत ( 19 ऑक्टोंबर ते 22 ऑक्टोबर 2023) महिला भाविकांची जाण्या- येण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. श्री.साईबाबा मंदिर परिसरात ही वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. श्री साईबाबा मंदिर, महेशनगर ते मंठा व परत श्री साईबाबा मंदिर, असा दर्शन प्रवास राहील.सकाळी 9 ते सायंकाळी 4 असा दर्शन यात्रेसाठी वेळ दिला आहे. फक्त महिलांसाठीच ही व्यवस्था करण्यात आली आहे. मोफत दर्शन यात्रा प्रवाससाठी संपर्क क्रमांक 8087205555,9371718525,9960 160963 या नंबर वर संपर्क करावा असे संयोजकानी कळविले आहे. दरवर्षी हा उपक्रम माजी नगराध्यक्ष गेल्या अनेक वर्षांपासून चांगल्या प्रकारे राबवीत असतात.या उपक्रमाला महिला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आला आहे. मित्र मंडळ आणी त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हिरहिरीने पुढाकार घेऊन उपक्रम अतिशय नियोजनबद्ध राबवीत असतात.यंदाही पहिल्याच दिवशी या उपक्रमाला हजारो महिला भक्त प्रतिसाद देत दर्शनाचा लाभ घेतला.सर्व महिला भक्तांनी विनोद बोराडे व मित्र मंडळाचे आभार मानले.


