करामत शाह
ग्रामीण प्रतिनिधी, आगर
आगर : येथे मागील दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा झाला नसल्याने गावकऱ्यांना पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.. विशेष म्हणजे पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या भवानी मातेचा उत्सव सध्या सुरू असल्याने गावात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असताना त्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने त्यांचे अतोनात हाल होत आहेत. पाणी पुरवठा विभागाने लक्ष मागणी होत आहे.आगर येथे नवरात्र असल्यानंतरही येथे पाणी पुरवठा जात नाही. खांबोरा प्रादेशिक पुरवठा योजनेंतर्गत येणाऱ्या पाळोदी, गोत्रा, नवथळ, परितवाडा व उगवा आदी आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा केला याकडे जातो. परंतु, दोन महिन्यांपासून पाणी देण्याची पुरवठा बंद असल्यामुळे ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी विकत घेऊन आपली उत्सव तहान भागवावी लागत आहे. याकडे केला कुठल्याही संबंधित अधिकारी वर्गाचे पाणी लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. तसेच आगर, ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे खेकडी, लागणारे पाणी हे प्रती टैंकर सातशे- गावांना आठशे रुपये असून तर एक कोठी २००लीटरची चाळीस ते पन्नास रुपये व पिण्याच्या पाण्याची कॅन वीस लीटरची वीस ते पंचवीस रुपयात मिळते. ही पाण्याची समस्या बारोमास नेहमीचीच असल्यामुळे हजारो रुपयांचे पाणी विकत घावे लागत असून, ग्रामपंचायतमार्फत पाणी पुरवठा योजनेचा पाणी कर सुध्दा ग्रामस्थांना भरावा लागतो. तसेच खारपाणपट्टा असल्याने टँकरद्वारे विकत घ्यावे लागणारे पाणी हे दूषित व खारे माठे पाणी प्यावे लागत असल्यामुळे ग्रामस्थांना त्वचेचे रोग, हगवण व पोटदुखी अशा अनेक लहान-मोठ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. तरी अशा गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी व संबंधित सर्व विभागाने लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरळीत चालू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
चौकट
वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आगर येथील पाणी पुरवठा गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने गावातील लोक नदी- नाल्यातील दूषित पाणी पित आहेत. सध्या आगर येथे नवरात्र उत्सव असल्याने पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण होत आहे. तरी अशा गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी व संबंधित सर्व विभागाने लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरळीत चालू करावा.”
- मनीष बुटे, शिवसेना जि. प. सर्कल प्रमुख,
आगर,