अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी – पाटापांगरा येथील आनंद सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष राजकुमार होळकर व अमोल डेहणकर मित्र मंडळ पाटापांगरा तसेच पाटापांगरा गावकरी मंडळी यांचे वतीने वनरक्षक शांतिदूत मुळे यांची वनपाल पदी पदोन्नती व सोनदाभी वन परीक्षेत्र येथे पदस्थापना झाल्याने तसेच पाटापांगरा येथील पोलीस पाटील नारायण डेहणकर हे सेवानिवृत्त झाल्यामुळे दोघांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाटापांगरा येथील तंटामुक्त गांव समितीचे अध्यक्ष राजु गुल्हाने, ग्रामपंचायत सदस्य सविता कांबळे, भारत जांभुळकर, संतोष बोरुले, अमोल डेहणकर, महादेव शिरभाते, मोहन कांबळे, संजय डेहणकर, अजय डेहणकर, दिगंबर गुल्हाने, गुरुदेव होळकर,अमोल खोब्रागडे, राजकुमार होळकर आदीं उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. दोघांच्याही कार्यकाळाबद्दल माहिती विषद केली. पोलीस पाटील नारायण पाटील यांचे कार्यकाळात गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहून गावात अनेक चांगले उपक्रम राबविण्यात आले. तसेच वन क्षेत्र सहाय्यक शांतिदूत मुळे यांनी पाटापांगरा गावाचे नाव नांव यवतमाळ जिल्ह्यात रोशन केल्याचे व कर्तव्य बजावून सर्वधर्म समभाव या दृष्टीने सामाजिक काम केले. अनेक मोठे मोठे उपक्रम त्यांनी राबविले.ज्यामध्ये मुधोनी येथील हनुमान मंदिराच्या पायऱ्या चे बांधकाम असो की, अनेक बुद्ध विहारात बुद्ध मूर्तीचे दान असो, दानदाते म्हणून ते ओळखले जातात. सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान खूप मोठे असल्याचे अनेक वक्त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देतांना दोघांनीही गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले. तसेच नारायण डेहणकर व संजय डेहणकर यांच्या मुलांची CRPF मध्ये निवड झाल्यामुळे त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अमोल डेहणकर यांनी केले. तर आभार राजकुमार होळकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी अतुल डेहणकर, शैलेश गुलवाडे, राजू गणपत गुल्हाने, ऋषिकेश गुल्हाने, शुभम डेहणकर, अक्षय गुल्हाने, प्रदीप जाधव, संदीप गुल्हाने, वेदांत डेहणकर, राजु राजगुरे, आकाश पवार, गौरव लोखंडे, अनुज होळकर, भावेश गुल्हाने, हिम्मत जीभकाटे, साहील गुल्हाने, गजानन पवार, रवी वांढरे, विलास सावंगेकार, रवी होळकर, चंदू राउत, प्रशांत निकोडे, सचिन कांबळे, सुनील कांबळे, गजानन मानकर, मनोज मानकर आदींनी सहकार्य केले. यावेळी सत्कार समारंभाला मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.












