सुदर्शन मंडले
ग्रामीण प्रतिनिधी आळेफाटा
जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि तेथील पंचक्रोशीत नावाजलेले व्यक्तिमत्व कृष्णा सीताराम शिरतर यांची गावच्या पोलीस पाटील पदी निवड करण्यात आली .पोलीस पाटील हा गावातील प्रशाकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा यातील दुवा आहॆ .पूर्वी महाराष्ट्रातील खेडेगावात कर वसुलीचे काम आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम वतनदार /जमीनदार पाटील यांच्या हाताखाली काम करणारे बारा बलुतेदार यांच्यामुळे वतनदार /जमीनदार पाटील यांच्याकडे सत्ता होती .वतनदारी आणि जमीनदारी पद्धती खालसा झाल्यानंतर गाव कामगार व पाटील यांच्यावर देखरेखीचे काम मामलेदाराकडे सोपवले गेले . ब्रिटिश काळात प्रथमच ‘मुंबई ग्राम पोलीस अधिनियम १८६७अंमलात आणला गेला .त्यातील तरतूदअन्वये गाव पोलिसांचे अधिकार देण्यात आले .आणि पोलीस पाटील या पदाला शासकीय दर्जा देण्यात आला .शिरतर यांची निवड झाल्यामुळे गावातून आणि पंचक्रोशीतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहॆ .