शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : दि २२ऑक्टोबर रोजी सेलुत मराठवाडा विभागीय शिक्षक सवांद मेळावा.मुंबई येथे शिक्षकांच्या महा एल्गार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सेलूत विभागीय शिक्षक सवांद मेळावा महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय संघाने दि. ३० ऑक्टोबर २३ रोजी आझाद मैदान मुंबई येथे महा एल्गार आयोजित बेमुदत धरणे आंदोलन व आमरण उपोषण या आंदोलनास जाण्या साठी मराठवाडा विभागीतील सर्व खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकाकरिता मराठवाडा विभागीय शिक्षक संवाद मेळावा ( ता. २२ ) ऑक्टोबर रोजी श्री साईबाबा मंदिर महेश नगर सेलू येथे रविवार सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या मराठवाडा विभागीय शिक्षक संवाद मेळाव्यात राज्यातील २२ शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून ३०ऑक्टोबरच्या आझाद मैदान येथे होणाऱ्या महाएल्गार आंदोलना संदर्भात पुढील नियोजन व आवश्यक मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये प्रमुख मागणी म्हणजे १) विना तथा अंश: अनुदानित शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेत्तेर कर्मचार्यांना १५ नोव्हेंबर २०११ व ४ जुन २०१४ या शासन निर्णयानुसार नुसार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय यांना प्रचलित नियमानुसार १००% अनुदान देण्यात यावे. २) दि. १२, १५ व २४ फेब्रुवारी २०२१ शासन निर्णयानुसार त्रुटी पुर्तता केलेल्या शाळांना समान टप्प्यावरील अनुदान मिळणे. ३) १२ डिसेंबर २०२२ सेवासंरक्षण आदेशात सुधारणा करुण १००% अनुदानित शाळांवर समायोजन करणे ४) अंशत: अनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालया वरिल कार्यरत कर्मचारांना वैद्यकिय प्रतिपुर्तता योजना लागु करणे. ५) अंशत: अनुदानित शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे NPS खाते उघडणे. आदी मागणीसाठी संपूर्ण राज्यातून हजारो बांधव हे आझाद मैदानावर उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, बीड, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त बांधवानी सेलू जिल्हा परभणी येथे उपस्थिती रहावे असे आवाहन शिक्षक समन्वय संघ जिल्हा परभणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
त्यासाठी शिक्षक समन्वय संघ हा मराठवाडा विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयावर जाऊन ३० ऑक्टोबर २३ रोजी आझाद मैदान मुंबई येथे होणाऱ्या महाएल्गार या आंदोलनास उपस्थित राहावे यासाठी भेटी देत आहे. या भेटीत सर्व शिक्षक बांधव प्रचंड प्रतिसाद देत असून सेलू येथे होणाऱ्या मराठवाडा विभागीय शिक्षक संवाद मेळावास उपस्थित राहण्याचा सर्वांनी संकल्प केला आहे. माझा पगार माझी जबाबदारी त्यासाठी एकदा शेवटची मुंबई वारी” साठी आपल्या हक्काच्या अनुदानाच्या लढाईत मराठवाड्या तील जास्तीत जास्त शिक्षक, महिला भगिनी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षक समन्वय संघ जिल्हा परभणी यांनी केले आहे.