अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी – घाटंजी शहरातील भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने घाटंजी शहरातील प्रमुख मंदिर व बौद्ध विहार येथील माती एकत्र करण्यात आली. यावेळी प्रत्येक मंदिराच्या परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने ‘मेरी माटी मेरा देश’ या पेक्षा वेगळी संकल्पना शहरातील प्रमुख मंदीर तथा बौद्ध विहार मधील पवित्र माती अमृत कलश मध्ये गोळा करण्यात आली.यामध्ये गणेश मंदीर, गुरुदेव वार्ड घाटी, जगदंबा मंदीर अबांनगरी, श्रीराम मंदिर, अस्टभुजा देवी मंदीर वसंत नगर, शीतला माता मंदीर जगदंबा नगरी, बौद्ध विहार वसंतनगर येथील माती अमृत कलशात गोळा करण्यात आली.या अभियानात आर्य वैश्य महिला समाज संघटनेच्या अध्यक्षा साधना माडुरवार, घाटंजी नगर परिषदेच्या माजी नगरसेविका पुष्पा नामपेल्लीवार, घाटंजी शहर भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा रीना धनरे, राधिका गुंडावार, लता ठाकरे, सारिका उगले, किरण गंगमवार, वैशाली सुखाडिया, गुरुदेव वार्ड घाटी प्रभागातील महिला मंडळाच्या
रोशनी गोडे, वंदना ठाकरे, सुधा ठाकरे, बेबी राजुरकर, साधना राजुरकर, पूजा राजुरकर, प्रमीला भोयर, पूजा भोयर, चंद्रकला भोयर , ममता कस्तूरे, सुधा धकाते, सुशीला सहारे, आरती राउत, शीला भुरघाटे, योगिता पवार, लीला गिनगुले, बेबी भोयर, जगदंबा नगरीच्या प्रतिभा कोंबे, श्रद्धा काळे, अनीता डंभारे, प्रगती चौधरी, पूजा ठाकरे, पूजा दीकुंडवार, निशा राठोड, वसंत नगर येथील उमा भाटशंकर, रमा भगत, संघमित्रा भवरे, माया खोब्रागडे, रेखा इंगोले, पुष्पा मनोहर, योगिता मुनेश्वर, साक्षी मनोहर, ममता कांबळे आदींनी या अभीयानात सहभाग घेतला होता.